शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पुरवठ्यासाठी सरसावला कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:16 IST

आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे.

जळगाव नेऊर : आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे.कृषी आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार, येवला कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक यांनी आपापल्या सजेतील शेतकरी बांधवांनी पिकविलेला भाजीपाला शहरी भागात विकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी सहायक साईनाथ कालेकर यांनी माहिती संकलित करून कृषी उत्पादक गटामार्फत सदर भाजीपाल्याची शहरांमध्ये एक दोन व्यक्तींनी जाऊन विक्र ी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना भांडवल मिळू लागले आहे. जय भद्रा कृषी विज्ञान मंडळामार्फत अध्यक्ष ज्ञानेश्वर पगार यांनी व कृषी सहायक साईनाथ कालेकर यांनी भाजीपाला पुरवठा सुरू केला आहे.आजमितीस मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्षबागा उभ्या आहेत; पण व्यापारी खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांना आधार म्हणून कृषी विभाग येवला येथील सर्व कर्मचारी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर द्राक्ष खरेदीसाठी जाहिरात करत असून, स्वत:कडे आॅर्डर नोंदवून विक्र ी करण्यासाठी मदत करत आहे. आजपर्यंत येवल्यात दहा क्विंटलपेक्षा जास्त द्राक्ष विक्र ी करून शेतकरी बांधवांना हातभार लावला आहे.- साईनाथ कालेकर, कृषी सहायक, पिंपळगाव लेप.कोटउन्हाळ्यात भाजीपाल्या चांगला दर असतो यादृष्टीने शेतात भाजीपाला पिकवला; पण कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाला वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाच्या परवानगीने शहरात भाजीपाला विक्र ी करून चार पैसे पदरात पडत असल्याने होणारे नुकसान टळले.- ज्ञानेश्वर पगार, अध्यक्ष, जय भद्रा कृषी विज्ञान मंडळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र