लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील येवला कृषी कार्यालयात आपल्या विविध न्याय मागण्यासाठी काळ्या फिती लावून कृषी सहायकांनी कामकाज केले. येवल्यात तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध संघटनेस विचारात घेण्यात तत्काळ तयार करण्यात यावा, कृषी पर्यवेक्षकपदावर कृषी सहायकातूच १०० टक्के पदोन्नती देण्यात यावी, कृषी सेवकांचा तीन वर्षांचा सेवक शिक्षण सेवकांप्रमाणे ग्राह्य धरण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहायकांनी सोमवारपासून आंदोलनाला सुरु वात केली आहे.शासनाने ३१ में २०१७ रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापनेचा शासन निर्णय काढला. यामध्ये कृषी विभागाकडून ९९६७ इतकी पदे मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्याचे नमूद केले आहे. परतुं उर्वरीत कृषि विभागात राहणाऱ्याअधिकारी व कर्मचारी यांचा आकृतिबंध काय असणार हे माहीत नसल्याने विभागातील अधिकारी व कर्मचारी संभ्रमात आहेत. सुधारित आकृतिबंध नसल्याने संभ्रमात असलेले कृषि सहय्यकानी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारी येथे तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद आढाव, जिल्हा महिला संघटक सुनीता कडनोर, कुंडलिक ढगे, मंगेश कोकतरे, खाडे, प्रकाश जवने, साईनाथ कालेकर यांनी काळ्या फीती लावून कामकाज केले.आंदोलनाचे टप्पे१२ ते १४ जून काळ्या फिती लावून कामकाज करणार असून, १५ ते १७ जूनपर्यत लेखणी बंद आंदोलन करण्यात येऊन १९ जूनला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहे. २१ ते २३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात साखळी उपोषण, २७ जूनला विभागीय कृषिसह चालक कार्यालयावर धरणे आंदोलन , १ जुलैला कृषि आयुक्त पुणे कार्यालयावर मोर्चा व निदर्शने तर १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
कृषी सहायकांचे आंदोलन सुरू
By admin | Updated: June 13, 2017 01:01 IST