शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:45 IST

शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे. या दरवाढीविरोधात नाशिककर संताप व्यक्त करीत असून, पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे.

नाशिक : शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे. या दरवाढीविरोधात नाशिककर संताप व्यक्त करीत असून, पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे.  केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केली असून, तेव्हापासून नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात ६.१६ रु पये प्रति लिटरने वाढ होऊन ते ८१.९९ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेलच्या किमतीत ९.२३ रुपयांनी वाढ झाली असून, ते ६८.१५ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, शहरवासीयांकडून पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्याची मागणी केली जात आहे. पेट्रोलच्या दरात चढ-उतार होत असला तरी किमान इंधनावरील कर कमी होऊन पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होतील, अशी नाशिककरांना अपेक्षा आहे. पेट्रोलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगप्रणाली असून, प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टीमची सुरु वात गेल्या १६ जूनला लागू करण्यात आली. या सिस्टीमनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसारच बाजारातील पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. ही पद्धत लागू केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट झाली होती. मात्र, त्यानंतर सातत्याने इंधनाच्या किमतीत वाढ होत असून, ही वाढ हळुवार होत असल्याने त्यावर कुणाचेही लक्ष गेले नाही.चार वर्षांतील उच्चांकी दरतेल कंपन्या रोजच्या रोजच तेलाच्या किमतीत वाढ करत आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून, सोशल मीडियातूनही पेट्रोल व डिझेल दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढणाऱ्या किमतीची आकडेवारी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व टष्ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोल