शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST

पुन्हा स्वाइन फ्लूचा रुग्ण

 

नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच असून, चालू महिन्यात आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दोन महिन्यात २५ रुग्ण झाले आहेत. त्यातच जेलरोड भागात आणखी एक स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, पालिकेचा गलथानपणा यानिमित्ताने दिसत असून, डास निर्मूलनाचा ठेका संपून आठ महिने झाले तरी अद्याप नवीन ठेकेदार नियुक्त झालेला नाही.शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रोगराईचे वातावरण आहे. दोन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्णदेखील आढळत आहेत. आत्तापर्यंत शहराच्या विविध भागांत २५ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. आॅगस्ट महिन्यात त्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण गंजमाळ, कालिका मंदिर झोपडपट्टी, पाथर्डी फाटा, शिवाजीनगर (नाशिकरोड) या भागातील आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या विविध भागांत आत्तापर्यंत ९० संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी जेलरोड भागात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. आता आणखी एक महिला रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सदर महिलेचे वय ४५ वर्षे असून, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहरात वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका सतर्क होणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र कोठेही असे चित्र दिसत नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात डास निर्मूलन ठेक्याची मुदत संपली आहे. त्यानंतर आठ महिने झाले तरी नवीन ठेकेदार नियुक्त झालेले नाही. पालिकेने यापूर्वी डास निर्मूलन ठेक्यासाठी निविदा मागविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ठेका मंजुरी रखडली. त्यानंतर स्थायी समितीची रचना आणि सभापतिपदाच्या निवडणुकीचे निमित्त करण्यात आले. आता स्थायी समिती अस्तित्वात येऊन दोन महिने झाले; परंतु अद्याप हा विषयच पटलावर आलेला नाही. सध्या ठेक्याचा विषय लेखापरीक्षकांकडे अडकला आहे, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)