शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथपालांवर पुन्हा अन्याय : ग्रंथालय शिक्षक परिषदेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:17 IST

राज्यातील ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगात बारा वर्षांनी लागू असणाऱ्या कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ न देता आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मूळ वेतनश्रेणीच्या ग्रेड वेतनास अतिरिक्त ग्रेड वेतन लागू केल्यामुळे ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप ग्रंथालय शिक्षक परिषदेकडून करण्यात आला आहे.

नाशिक : राज्यातील ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगात बारा वर्षांनी लागू असणाऱ्या कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ न देता आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मूळ वेतनश्रेणीच्या ग्रेड वेतनास अतिरिक्त ग्रेड वेतन लागू केल्यामुळे ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप ग्रंथालय शिक्षक परिषदेकडून करण्यात आला आहे.आश्वासित प्रगती योजना शालेय शिक्षण विभागासाठी लागू नसताना केवळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी यांना लागू केल्यामुळे या दोन्ही पदांवर अन्याय झाला, असा आरोप ग्रंथालय शिक्षकांकडून होत असून, शासनाच्या वेतनत्रुटीच्या १२ जानेवारी २००० च्या व वित्त विभागाच्या ३ आॅगस्ट २००१ च्या शासन निर्णयानुसार ग्रंथपालांना अनुज्ञेय असलेल्या कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ दिला नसल्यामुळे ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी आक्रमक भूमिकेच्या तयारीत आहे.सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनश्रेणीच्याच धरतीवर वेतन निश्चिती होत असल्यामुळे ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. ग्रंथपालांच्या वैतनश्रेणीवर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय होत असून, आता तर कालबद्ध वेतनश्रेणीवरही अन्याय झाल्याचे ग्रंथालय शिक्षक संघटनेचे मत आहे. वेतनश्रेणीच्या अन्यायाविरोधात दोन्ही संघटनांचा न्यायालयीन लढा सुरू असून, आता कालबद्ध वेतनश्रेणीच्या अन्यायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी सांगितले. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यबळ गटाने शासनाच्या १४ जून २०१६ या ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीतील शासन निर्णयामध्ये कालबद्ध वेतनश्रेणीचा उल्लेख नसल्यामुळे ग्रंथपालांना अनुज्ञेय असलेली कालबद्ध वेतनश्रेणी लागू केली. मात्र वेतन निश्चितीनुसार वेतनाचा लाभ न मिळाल्यामुळे ग्रंथपालांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.पूर्वलक्षी : प्रभावाने अंमलबजावणीची मागणीसातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत पदवीधर व पदविकाधारक ग्रंथपालांसाठी सारखीच वेतनश्रेणी लागू केल्यामुळे प्रमाणपत्रधारक ग्रंथपाल जे पदवीधर आहेत त्यांनाही कोणती वेतनश्रेणी लागू होईल याबाबत प्रमाणपत्रधारक ग्रंथपालांना शंका आहे. चौथ्या वेतन आयोगापासून ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीवर तसेच कालबद्ध वेतनश्रेणीवर होत असलेल्या अन्यायाबाबत वेळेत न्याय न मिळाल्यास राज्यात पुन्हा ग्रंथपाल न्यायालयीन याचिका दाखल करतील. त्यामुळे ग्रंथपालांना पूर्वलक्षी प्रभावाने न्याय मिळावा, अशी मागणी ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार, जगदीश चित्ते, विनोद भंगाळे, जितेंद्र्र पाठक आदींनी केली आहे.अर्धवेळ ग्रंथपाल सातव्या वेतन आयोगापासून वंचितशासनाने पूर्णवेळ कर्मचारी यांच्यासाठी सातवा वेतन आयोग लागू केला, मात्र रात्र शाळेतील कर्मचारी व अर्धवेळ ग्रंथपालांसाठी शासन निर्णय नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांसोबतच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वित्त विभागाकडे मंजुरीसाठी असलेला हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून अर्धवेळ ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ त्वरित लागू करावा, अशी मागणी ग्रंथपाल शिक्षक परिषदेकडून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :libraryवाचनालयNashikनाशिक