शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विजयानंतर लगेचच उपसरपंचपदाचा राजीनामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:28 IST

ऐकावे ते नवलच : विरोधकांना ताकद दाखविण्यासाठी लढवली निवडणूक

ठळक मुद्देबच्छाव यांनी नानाजी माळी यांचा एक मताने पराभव केला.

माळवाडी : गावगाड्यातील राजकारणात काय किस्से ऐकायला मिळतील याचा नेम नाही. केवळ विरोधकांना आपली ताकद दाखविण्यासाठी निवडणूक लढवून नंतर राजीनामा देण्याचा प्रकार देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये घडला. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण बच्छाव यांनी एका मताने विजय मिळविला आणि काही तासांतच पदाचा राजीनामाही दिला. केवळ विरोधकांना आपली ताकद दाखविण्यासाठीच्आपण निवडणूक लढविली आणि विजय संपादन केला. पदाचा मोह नसल्याने आपण राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी (दि.३०) पदभार स्वीकृतीसाठी व त्याच बरोबर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी ग्रामपंचायत सभागृहात बैठक बोलविली होती. यावेळी सरपंच उषा शेवाळे यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना देऊन सदर इच्छुक सदस्यांना अर्ज करण्यास सूचित केले. त्याप्रमाणे उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने रीतसर मतदान घेऊन परदेशी यांनी एका मताने लक्ष्मण बच्छाव यांना विजयी घोषित केले. बच्छाव यांनी नानाजी माळी यांचा एक मताने पराभव केला. पण बच्छाव यांनी विजय झाल्यानंतर काही तासांतच आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. अद्याप निवडणूक अधिकारी व सरपंच यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, परंतु लक्ष्मण बच्छाव मात्र आपला राजीनामा मंजूर करण्यासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे  निवडणूक अधिकारी व सरपंच काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी सरपंच उषा शेवाळेसह ९ सदस्य व समर्थक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कोट.................मी उपसरपंच पदाची निवडणूक लढवून विजय मिळवणे हे फक्त विरोधकांना दाखवण्यासाठीचा हा यशस्वी प्रयत्न होता. मला पदाची कुठलाही लोभ नसून आता पुढे आम्ही आमचे सदस्य शकुंतला शेवाळे यांना उपसरपंच करू.- लक्ष्मण बच्छाव

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक