देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष हे गाव हरिहर किल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मात्र, येथील नागरिक खंडित वीजपुरवठ्याने हैराण झाले होते. याबाबत महावितरण विभागाला कळवले असता थकीत विजबिलाचे कारण देऊन टाळाटाळ केली जात होती. दि. १८ एप्रिल रोजी ह्यलोकमतह्णमध्ये ह्यविद्युत रोहित्र निकामी झाल्याने टाकेहर्ष अंधारात !ह्ण या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची महावितरण विभागाने दखल घेत तत्काळ कार्यवाही करत टाकेहर्षकरांना ६३ अश्वशक्तीचे रोहित्र उपलब्ध करून दिले.महिलांची पायपीट थांबलीविजेअभावी त्रस्त झालेल्या महिलांना दूरवरून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत होती. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिठाची गिरणी बंद असल्याकारणाने संचारबंदीच्या दिवसांत इतरत्र ठिकाणाहून दळून आणावे लागत होते. तसेच यादरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तू वापर होत नसल्याने असून नसल्यासारख्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.गेल्या दहा दिवसांपासून गावामध्ये अंधार दाटला होता. ह्य लोकमतह्णच्या पाठपुराव्याने आम्हाला प्रकाश मिळाल्याने सर्व ग्रामस्थांतर्फे आभार.- धर्मा भस्मे, सरपंच, टाकेहर्षटाकेहर्ष येथे नवीन रोहित्र बसविण्याचे सुरू असलेले काम. (२० देवगाव)
दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:37 IST
देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.
दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत
ठळक मुद्देमहावितरण विभागाची तत्काळ कार्यवाही