शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रसादला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले

By admin | Updated: April 14, 2016 00:45 IST

प्रसादला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले

 नाशिकरोड : २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या साडेपाच वर्षाच्या प्रसाद पोरजे याला बुधवारी दुपारी सुखरूपपणे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. प्रसादला सुखरूप मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली खबरदारी व मेहनत बघून वडनेरदुमालावासीयांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. दरम्यान अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी याच्यादेखील उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.वडनेरदुमाला येथे संपत पोरजे यांच्या गोठ्यात काम करणारा गडी कामगार राजू ऊर्फ राकेश घनीराम पटेल व त्याच्या एका सहकाऱ्याने पोरजे यांचा साडेपाच वर्षाचा मुलगा प्रसाद याचे शनिवारी सायंकाळी अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितली होती. या घटनेची पोलीस प्रशासनाच्या विविध विभागाने गोपनीयता बाळगत तांत्रिकदृष्ट्या तपास करून संशयित राजू पटेल याचा मार्ग शोधून काढला. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक सुनील पाचरणे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी जबलपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोशलपूर या गावातून प्रसाद याला सुखरूपपणे ताब्यात घेत संशयित राजू पटेलच्या मुसक्या आवळल्या.मुलगा प्रसाद व संशयित राजू याला घेऊन पोलिसांचे पथक सकाळी नाशिकरोडला दाखल झाले. उपनगर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसाद याला त्याच्या कुटुंबीयांच्या सुखरूप स्वाधीन केले. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते; मात्र पोलीस प्रशासनाची एकजूट, मेहनत व बाळगलेली गोपनीयता बघून वडनेरवासीयांची छाती अभिमानाने फुलल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. यावेळी पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, क्राइम ब्रॅँचचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोलीस तांत्रिक विभागाचे पोलीस निरीक्षक आर.डी. कुटे, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ माळी, उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस नाईक सुनील पाचरणे आदिंचा नगरसेवक केशव पोरजे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महेंद्र पोरजे, विलास पोरजे, वाळू पोरजे आदिंच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भावनाप्रधान या कार्यक्रमात पोरजे कुटुंबीय व वडनेरवासीयांचे डोळे पाणावले होते. यावेळी शेखर भालेराव, संजय गायकवाड, रमेश आहेर, अजित गायकवाड, भास्कर सातव आदिंसह वडनेरचे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)