शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.

By admin | Updated: August 7, 2016 01:39 IST

गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.

पंचवटी : बहोत बरसोंसे गंगामाई का दर्शन करने की और गंगा में डुबकी लगाने की इच्छा थी, सुबह यहाँ घाटपर आये तो देखा पाणी बहोतही भरा हुआॅ है, तो हम लोगोंको वापस जाना पड रहा है, असे म्हणत देवदर्शनासाठी गंगाघाट परिसरात आलेल्या परराज्यातील भाविकांना गोदावरीचा पूर बघून दुरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.मंगळवारचा पूर ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आला. या पुराच्या पाण्याचा फटका परराज्यातून नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसला. शेकडो किलोमीटर प्रवास करून ज्या गोदामाईचे दर्शन व रामकुंडात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची पुरामुळे बोळवण झाली. परराज्यातून आलेल्या भाविकांना रामकुंड, नारोशंकर मंदिर, तपोवन परिसरात जाता आले; मात्र पुरामुळे लांबूनच दर्शन घ्यावे लागत होते. शनिवारीच्या दिवशी सकाळी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदि राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांना गंगाघाट वगळता राममंदिर, सीतागुंफा, भक्तिधाम, काट्या मारु ती आदि मंदिरांचे दर्शन करता आले.सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत दर्शनासाठी यायचे होते, परंतु खूप गर्दी असल्याने यायला जमले नाही. पावसाळ्यात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी कमी असते म्हणून आम्ही आमच्या नातेवाईक व मित्रपरिवारासह आलो पण गोदावरीचा पूर बघून आम्हाला लांबूनच दर्शन घेऊन माघारी परतावे लागत असल्याचे भाविकांनी बोलून दाखिवले.