शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा बँक कर्मचाºयांवरील ताण अद्यापही कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:34 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा केल्या जात असल्याने त्यांची अंमलबजावणी करताना नाकीनव आलेल्या बँक कर्मचाºयांना प्रतिदिन १२ ते १४ तास जादा काम करूनही ग्राहकांचा रोष सहन करावा लागला़ पैसे जमा करण्यासाठीची मोठी रांग व बँकामध्ये फेक करन्सी डिटेक्शन मशीनचा अभाव यामुळे ग्राहकांकडून स्वीकारलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर त्यामध्ये काही नोटा बनावट आढळून आल्या़ बँकांनी या बनावट नोटांची भरपाई करावी, असे पत्र रिझर्व्ह बँकेकडून पाठविण्यात आले आहे़

ठळक मुद्देबनावट नोटांची रक्कम भरून देण्याची वेळकर्मचाºयांना ग्राहकांकडून शिवीगाळ दिवसेंदिवस कामाचा ताण वाढतो आहे़

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा केल्या जात असल्याने त्यांची अंमलबजावणी करताना नाकीनव आलेल्या बँक कर्मचाºयांना प्रतिदिन १२ ते १४ तास जादा काम करूनही ग्राहकांचा रोष सहन करावा लागला़ पैसे जमा करण्यासाठीची मोठी रांग व बँकामध्ये फेक करन्सी डिटेक्शन मशीनचा अभाव यामुळे ग्राहकांकडून स्वीकारलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर त्यामध्ये काही नोटा बनावट आढळून आल्या़ बँकांनी या बनावट नोटांची भरपाई करावी, असे पत्र रिझर्व्ह बँकेकडून पाठविण्यात आले आहे़ त्यामुळे जादा कामाचा मोबदला तर सोडाच शिवाय बनावट नोटांची रक्कम भरून देण्याची वेळ बँकांवर अर्थात कर्मचाºयांवर आली आहे़नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरुवातीचे आठ दिवस १२ ते १४ तास, त्यानंतर जानेवारीपर्यंत दररोज दहा तास कर्मचाºयांनी काम केले़ प्रतिदिन बदलणारे निर्णय नागरिकांना सांगितल्यानंतर कर्मचाºयांना ग्राहकांकडून शिवीगाळ केली जात असे़ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले, विवाहासाठी दीड लाख रुपये देण्याचे आदेश सरकारने दिले, मात्र बँकेकडे पैसेच नसायचे़ त्यात पैसे देण्याच्या अटी या क्लिष्ट व अव्यवहार्य होत्या़ बँकेत मोठ्या संख्येने हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी येत असल्याने बँकेतील सर्वच कर्मचारी कॅशियरच्या भूमिकेत होते़ त्यातच बनावट नोटा ओळखण्याचे फेक नोट मशीनही बँकाकडे उपलब्ध नसल्याने प्रत्येक नोटेची तपासणी करणेही शक्य नव्हते़ बँकेत भरलेल्या हजार-पाचशेच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर करन्सी चेकमध्ये काही बनावट नोटाही आढळून आल्या़ या बनावट नोटांच्या रक्कमेची भरपाई संबंधित बँक वा शाखेने करावी असे पत्र रिझर्व्ह बँकेने पाठविले आहे़ यामुळे ग्राहकांना सेवा देणाºया बँकेतील कॅशियर व कर्मचारी यांना या रकमेची भरपाई आपल्या वेतनातून करावी लागणार असून, काही बँकाकडून ती वसूलही करण्यात आली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाची कोरडी स्तुती केली; जादा कामाचा मोबदला दिलाच नाही असे बँक कर्मचारी सांगतात़ प्रत्यक्षात तीन महिने जादा काम करूनही केवळ सुरुवातीच्या तीन दिवसांच्या जादा कामाचे वेतन कर्मचाºयांना दिले गेले तर केवळ तीनच बँकांनी दीड महिन्यांचे जादा कामाचे वेतन दिले उर्वरित बँकांनी मात्र सरळ हात वर केले़ नोटबंदीचा निर्णय हा सरकारचा असला तरी हे आपलेच मिशन असल्याप्रमाणे बँकांनी काम केले़ ग्राहकांच्या खात्यात पैसे असूनही बँकांना ते देता येत नव्हते़ पाच हजार, दहा हजार रुपयेच देण्याची मर्यादा त्यात दोन हजारांची नोटेच्या सुट्यांची समस्या यामुळे ग्राहक कर्मचाºयांनाच शिव्या द्यायचे़ नोटाबंदीमुळे बँकेचे कर्जदार अडचणीत आल्याने ते कर्जाची परतफेड करू शकले नाही व एनपीएची रक्कम वाढली़ मात्र, या कालावधीत बँकांमधील डिपॉझिट वाढल्याने ग्राहकाला व्याज द्यावे लागले़ थोडक्यात नोटाबंदीमुळे बँक व्यवसायाचे जे कंबरडे मोडले त्यातून ती अजूनही सावरलेली नाही़ सरकारने सुरू केलेले डिजिटलायझेशन, आधार लिंक यांसारख्या कामांमुळे कर्मचाºयांचे काम वाढले आहे़ मात्र नोकरभरती बंद असल्याने दिवसेंदिवस कामाचा ताण वाढतो आहे़