नाशिक - ‘फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ असा कडक इशारा उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना दिल्यानंतर महापालिकेने अनधिकृत होर्डींग्जविरोधी कारवाईला सुुरूवात केली असून मंगळवारी (दि.१६) एका दिवसात ५१ होर्डींग्ज हटविण्यात आले आहेत. अनधिकृतपणे होर्डीग्ज आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने त्या-त्या विभागीय अधिका-यांना दिले आहेत.नाशिकसह राज्यात वाढती फलकबाजी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्यावर्षी फलकबाजीतून होणारे विद्रुपीकरणी रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय ओक व पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक शहरात फलक हटविले गेले. परंतु त्यानंतर पुन्हा फलकबाजांचे पेव फुटले. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आली असली तरी अन्य सर्व ठिकाणचा विचार करता राज्य शासनाने जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ती मुदत संपत आल्याने गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत आता २३ फेबु्रवारी ही अंतिम मुदत दिली आहे. यानंतर फलक दिसल्यास त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे समजून कारवाई करण्यात येईल, असा इशाराच न्यायमूर्तींनी दिला आहे. न्यायालयाच्या या दणक्यामुळे नाशिक महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डींग्जविरोधी कारवाई तिव्र केली आहे. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी लागलेले ५१ अनधिकृत होर्डींग्ज हटविण्यात आले तर विद्युत खांबांवर लावण्यात आलेले २०८ बॅनर्स हटविण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे. शहरात कुठेही अनधिकृत फलक आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाचाच आदेश असल्याने महापालिकेने आता होर्डीग्जबाबत गांभीर्याने घेतले असून त्यामुळे फलकबाजांना चाप बसणार आहे. गेल्या काही महिन्यात महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाच्या पदाधिका-यांकडूनच अनधिकृतपणे होर्डीग्ज कुठेही उभारण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला संबंधितांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.विभागनिहाय केलेली कारवाईविभाग होर्डींग्ज बॅनर्सपूर्व ०९ ५०पश्चिम ०५ ७५सिडको १५ १७सातपूर ११ १२पंचवटी ०६ ५४ना.रोड ०५ ००एकूण ५१ २०८
उच्च न्यायालयाच्या डेडलाइननंतर नाशकात होर्डींग्जविरोधी कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:54 IST
महापालिका : दिवसभरात ५१ अनधिकृत होर्डींग्ज हटवले
उच्च न्यायालयाच्या डेडलाइननंतर नाशकात होर्डींग्जविरोधी कारवाई सुरू
ठळक मुद्दे ‘फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ असा कडक इशाराअनधिकृतपणे होर्डीग्ज आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश