शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच आसारामबापू भक्तांना रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता.

नाशिक : आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता. लैंगिक अत्याचार प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असल्यामुळे पहाटेपासून भाविकांनी येथील आश्रमात गर्दी गेली होती. सकाळपासून याठिकाणी भाविकांनी होमहवन आणि जपतप सुरू केले होते.  न्यायालयाने बापूंना दोषी ठरविल्यानंतर भाविकांना अश्रू आवरणे कठिण झाले. तरीही यावर विश्वास न ठेवता अहमदाबाद येथील मुख्य आश्रमातून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आश्रमाच्या संचालकांकडून भाविकांना करण्यात येत होते. निकाल काहीही लागला तरी भाविकांनी संयम राखावा, कुणीही रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन भाविकांना केले जात होते. परंतु भाविकांची मानसिकता लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. सकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे येत होते. सकाळी सुरू झालेले पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम दुपारपर्यंत अव्याहत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयाकडेदेखील सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रसारमाध्यमांपेक्षाही अहमदाबाद येथील आश्रमाकडून येणाऱ्या निवेदनावरच विश्वास असल्याची भूमिका भाविकांनी घेतल्याने आश्रमाच्या निवेदनाकडे त्यांचे लक्ष होते. मात्र निकालाची माहिती मिळाल्यानंतर भाविकांना रडू कोसळले. दरम्यान, आश्रमात मात्र प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात येऊन कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई करण्यात आली होती. भाविकांच्या भावना तीव्र असल्याने माध्यमांनी दूर राहण्याचा सल्ला आश्रमाच्या संचालकांकडून दिला जात होता.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू