शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

अखेर पंधरा वर्षांनंतर नाशिकमधील वडाळा शिवारातील शंभर फुटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:26 IST

झोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई

ठळक मुद्दे महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या

इंदिरानगर -- वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमिनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.दहा वर्षांपूर्वी मुंबई आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभरफुटी रस्ता बनण्यात आला होता. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनिधकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. या अतिक्रमणामुळे लहान मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. सदर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना महापालिकेने लगतच उभारलेल्या इमारतीत घरकुल उपलब्ध करुन दिले होते. परंतु, घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या. अखेर महापालिकेने शनिवारी (दि.१६) झोपड्यांवर जेसीबी चालविला तर उर्वरित कारवाई सोमवारी करण्यात आली. शनिवारी ३५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. सोमवारी पुन्हा सकाळी मोहीम राबवून सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. सुमारे पाच तास मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये, अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनिता कुमावत यांच्यासह मनपा अधिकारी यांचेसह १०० पोलिस कर्मचारी तैनात होते.भंगारवाल्यांची कमाईमहापालिकेने संपूर्ण झोपडपट्टी भुईसपाट केली. मोहिमेनंतरही रहिवाशांनी उद्धवस्त झोपड्यांमधून आपले सामान शोधण्यासाठी गर्दी केली होती तर भंगार व्यावसायिकांनीही चांगली कमाई केली. भंगार खरेदी करण्यासाठी काही व्यावसायिक चकरा मारत होते. अनेकांनी सामान काढून घेत दुसरीकडे आसरा शोधण्यास सुरुवात केली तर महापालिकेने तातडीने बांधकामाचे ढिगारे हटविण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका