शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त

By admin | Updated: November 11, 2014 00:56 IST

तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त

नाशिक : महापालिकेला तब्बल आठ महिन्यांनी प्रवीण गेडाम यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त लाभले असून, त्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. त्यामुळे अखेरीस प्रतीक्षा संपली असून, आता तुंबलेली नागरी कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसरीकडे मनसे काय नवनिर्माण करणार याची उत्सुकता आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त संजय खंदारे यांच्या आचारसंहिता कालावधीतील वादग्रस्त निर्णयांमुळे १३ एप्रिल रोजी बदली झाली. त्यानंतर पालिकेला पूर्णवेळ आयुक्त शासन नियुक्त करीत नव्हते. त्यामुळे मनपाचे कामकाज ठप्प झाले होते. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आयुक्त मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या; परंतु पुरुषोत्तम भापकर यांच्यासह ज्या अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमणुकादेखील झाल्या; परंतु नाशिकला आयुक्त तर नाहीच परंतु एमएमआरडीएचे राजीव उन्हाळे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा झाली आणि तीही हवेतच विरली.पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही आणि प्रभारी आयुक्त ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे नगरसेवकांची अवस्था बिकट झाली होती. महापालिकेत सत्तारूढ असलेल्या मनसेने तर पूर्णवेळ आयुक्तांंची नियुक्ती नाही हा राजकीय मुद्दा बनविला. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने नाशिकचे नवनिर्माण करता येत नाही, अशी कैफीयत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मांडली होती. त्यानंतर आता आयुक्त लाभल्याने कोणते नवनिर्माण होणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे.