शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

कोरोनानंतर आता म्युकॉर्मायकॉसीसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस ...

नाशिक : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असून, त्यामुळे अनेकांचे डोळे गमविण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या वतीने त्यास दुजोरा देण्यात आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात यासंदर्भात रुग्ण दाखल होत असल्याचेदेखील सांगण्यात आले. केवळ डोळेच नव्हे, तर मुत्रपिंड आणि मेंदूवरही आघात होऊ शकतो.

नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट इतकी भयंकर आहे की अनेक रुग्णांना ऑक्सिजनचीदेखील गरज भासत आहे. कोरोना रुग्णांची गंभीर अवस्था असेल तर त्यांना वाचविण्यासाठी उपचार करणारे डॉक्टर्स स्टुरॉईडस आणि अन्य टोसीलीझुमॅब इंजेक्शनचा वापर करतात. त्यानंतर हे रुग्ण बरे होत असले तरी नंतर मात्र, अशा औषधांच्या माऱ्यांचा प्रतिकूल परिणामदेखील जाणवत आहे. विशेषत: औषधांच्या माऱ्यामुळे म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशीजन्य आजार होतो. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर अशा औषधांच्या डोसचा विपरित परिणाम जाणवत आहे. अनेकांची डोळे, जबडा अशा ठिकाणी बुरशी जन्य आजार होत आहे. या बुरशीचा आघात होत असल्याने डोळे निकामी हाेतात आणि ते काढावेदेखील लागत आहेत. तसेच मुत्रपिंड आणि मेंदूवरदेखील या आजाराचा आघात होऊ शकतो, असे नाशिकमधील जाणकार वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले.

साधारणत: उपचाराचे हेवी डोस घेण्यामुळे प्रतिकारशक्ती नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या विकारांची मुख्य लक्षणे आहेत. दिल्लीत या आजाराचे रुग्ण वाढत असून, आरोग्य मंत्रालयानेदेखील चिंता व्यक्त करीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

कोट...

कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टुरॉईडस आणि अन्य टोसीलीझुमॅब इंजेक्शनचे साईड इफेक्ट असून त्यामुळे म्युकॉर्मायकॉसीस सारखे आजार हाेत आहेत. नाशिकमधील अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे अशाप्रकारचे रुग्ण दाखल आहेत. नाशिक महापालिकेकडे त्याची वेगळी नोंद नाही. मात्र रुग्ण आढळत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात मात्र कोरोनामुक्त करण्यासाठी अशाप्रकारची इंजेक्शन्स वापरली जात नाहीत.

- डॉ. आवेश पलोड, कोविड सेल प्रमुख, महापालिका

कोट...

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशाप्रकारचे म्युकॉर्मायकॉसीसचे रुग्ण आढळले होते. आता मात्र दुसऱ्या लाटेत मेाठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. वर्षभरात अशाप्रकारच्या जितक्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात असे, तितक्या रुग्णांवर तीन ते चार दिवसांत शस्त्रक्रिया करवी लागत आहे. डोळ्याजवळ दुखणे किंवा नाक दुखणे अशाप्रकारचे आजार काेरोनामुक्त रुग्णांना होत असल्याने त्यांनी तातडीने नाक, कान, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधावा. लवकर लक्षात आले तर शस्त्रक्रिया आणि उपचाराअंति दिलासा मिळू शकतो.

- डॉ. पुष्कर लेले, नाक, कान, घसा तज्ज्ञ