शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत ड्रेनेज सफाईनंतर रस्त्यावर गाळ, माती पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:18 IST

परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले ड्रेनेज सफाईचे काम ड्रेनेज विभागाकडून केल्यानंतर त्यामधून काढलेला गाळ व माती तत्काळ उचलून नेणे गरजेचे असताना ड्रेनेज विभागाकडून सदर रस्त्यावर काढून ठेवलेला गाळ व माती उचलली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ड्रेनेज सफाई केल्यानंतर गाळ, माती उचलण्याची जबाबदारी ड्रेनेज विभागाची नसल्याचे सांगत टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.पंचवटी परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज विभागाकडून दैनंदिन रस्त्यालगतच्या गटारी साफ करण्याचे काम केले जाते. गटार साफ केल्यानंतर गटारातील गाळ व माती ढाप्यांच्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. तीन ते चार दिवस गाळ व माती रस्त्यावर पडून राहत असल्याने संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर गाळ, माती उचलून नेण्याची जबाबदारी आमची नाही, दुसऱ्या विभागाची आहे असे सांगत टाळाटाळ केली जाते.ड्रेनेज विभागाकडून ड्रेनेज साफसफाईचे काम केले जात असले तरी त्यामधून काढलेला गाळ, माती उचललाच जात नसल्याचे चित्र वारंवार दिसून येते. पंचवटी ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरदेखील दखल घेतली जात नसल्याची ओरड खुद्द पालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केल्याने ड्रेनेज विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान