शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:31 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठळक मुद्देप्रमुख पक्षांची डोकेदुखी कार्यकर्त्यांची करावी लागणार मनधरणी

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर युती, आघाडीसह वंचित, मनसेने राजकीय गणिते जुळवली असली तरी अपेक्षित मतदारसंघ तसेच उमेदवारही न मिळाल्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त न करता ‘आता आमचंही ठरलंय !’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना त्याचे पडसाददेखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह नागपूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी या ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शविली असताना जिल्ह्यात अद्याप तशी परिस्थिती समोर आलेली नाही. मात्र अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याने अशीच परिस्थिती कायम राहील याची शाश्वती आता तरी देता येणार नाही.जिल्ह्यातून शिवसेना भाजपच्या कोणत्या जागांची अदलाबदली होते याकडे लक्ष असताना अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे तेथे निर्णय कोणताही झाला तरी पक्षाला अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे.उघड नाराजीवर एकवेळ तोडगा काढणे शक्य असले तरी पक्षाच्या अनपेक्षित भूमिकेमुळे धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आता आमचंही ठरलंय’, असे म्हणत पक्षाला धडा शिकविण्याचे मनसुबे आखल्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांना दुर्लक्षून चालणार नाही.आणखी काही नावांची घोषणा होणार असल्याने पक्षांतर्गत नाराजांमध्ये भर पडते की कार्यकर्त्यांचे समाधान होते यावर नाराजांचा आलेख कमी-अधिक होणारआहे. नाराजी होणार हे गृहीत धरूनच निर्णय घेतले असण्याची शक्यताआहे. त्यामुळे बऱ्यापैकी नाराजांना शांत करण्यास पक्षाला यश आले तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते काय ठरवितात, हे पाहणे मतमोजणीतूनच समोर येणार आहे.सर्वत्र नाराजी नाट्याला सुरुवातराजकीय पटलावर सध्या उमेदवारांचीच चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यात सर्वत्र नाराजी नाट्यालादेखील सुरुवात झालेली आहे. अगदी हक्काच्या मतदारसंघांमध्येदेखील पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास या कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा उमेदवारांच्या नावांकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने पुढील काही दिवसांत कार्यकर्त्यांची आणि नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षांची धावपळ होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक