शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अखेर बिबट्या जेरबंद

By admin | Updated: October 6, 2015 22:30 IST

सुटकेचा नि:श्वास : १५ दिवसांपासून मुखेड, सत्यगाव परिसरात होता वावर

मुखेड : सत्यगाव, मुखेड परिसरात पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सत्यगाव शिवारात पांडुरंग साबळे यांच्या मक्याच्या शेतात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन वर्षांपासून मुखेड परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेक ग्रामस्थांनी ते पाहिले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. वनखात्याचे कर्मचारी ठाकरे, सोनवणे, पगारे, जाधव आदिंनी समक्ष पाहणी केली असता, त्यांनाही बिबट्याच्या वावर असल्याचा माग आढळून आला. बिबट्याच्या पाऊलखुणा नजरेस पडल्या होत्या. पाच दिवसांपासून पांडुरंग साबळे यांच्या मक्याच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ आश्वस्त झालेले असले तरी चतुर बिबट्या पिंजऱ्या जवळून जात असूनही पिंजऱ्यात सावज नसल्याने जेरंबद होत नव्हता. वन विभागाकडे पिंजऱ्यात सावज ठेवण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास डरकाळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक या ठिकाणी आले. बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसले. तरुणांनी पिंजऱ्याला कुलूप लाऊन पिंजऱ्याजवळ ठाण मांडले. वन विभागालाही कळविल्यानंतर वनक्षेत्रपाल ठाकरे व सहाणे या ठिकाणी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला येवला येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात हलविण्यात आले. या मोहिमेत ललित सांगळे, आनंदा सांगळे, विश्वासराव आहेर, सत्यगावचे सरपंच ईश्वर आव्हाड, वाल्मिक सांगळे, नवनाथ काळे, रावसाहेब आहेर, राजेंद्र रोकडे, पांडुरंग दराडे, मुखेड सरपंच संजय पगार, छगन आहेर, अनंता अहेर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते. बिबट्याने भरवस्तीतील अशोक सानप यांच्या गायीवर हल्ला करून तिला फस्त केले होते. काही वर्षांपासून परिसरात हरणांची संख्यादेखील शेकडोने वाढली असून, त्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होत आहे. आता वनखात्याने परिसरातील हरणांचे, बिबट्या आदि वन्य प्राण्याच्या वावराबद्दल सजग अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)