लोकमत न्युज नेटवर्कवणी : अनियंत्रित वेगात कार चालुन समोरून येणाऱ्या दुचाकीला विरुध्द दिशेने जाऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर एक जखमी झाल्याच्या प्रकारानंतर फरार झालेला कारचालक नंदु कापसे याच्यावर अखेर दिंडोरी पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची माहिती अशी की विशाल उर्फ कपिल सुमतीलाल आहेर (भांडणे, हातगड, तालुका कळवण) व योगेश देवराम बोरसे (दळवट, तालुका कळवण) हे दोघे युवक दुचाकीवरून दिंडोरी नाशिक रस्त्याने नाशिकला जात होते. त्यादरम्यान एम एच १५ जी ए ७१२५ ही अल्टो कार नंदकुमार बाबुराव कापसे (टेकाडी, वणी) हा नाशिक दिंडोरी रस्त्यावरून वणीकडे भरधाव कार चालवित होता. दरम्यान ढकांबे शिवारातील हॉटेल वाडा परिसरात नंदु कापसे याचे कारवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाऊन कारने दुचाकीला धडक दिली, त्यात विशाल आहेर याचा डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने जागीच मृत्यु झाला तर योगेश बोरसे हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर कार चालक फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी फरार कार चालक नंदू बाबुराव कापसे याचा शोध घेतला व त्याच्या विरुध्द पोलीस हवालदार जाधव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखेर त्या कारचालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 17:11 IST
वणी : अनियंत्रित वेगात कार चालुन समोरून येणाऱ्या दुचाकीला विरुध्द दिशेने जाऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर एक जखमी झाल्याच्या प्रकारानंतर फरार झालेला कारचालक नंदु कापसे याच्यावर अखेर दिंडोरी पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अखेर त्या कारचालकावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देवणी : अपघात करुन झाला होता फरार; एक ठार एक जखमी