शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांनंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:40 IST

राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता.

नाशिक : राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. त्यानंतर मात्र १९ वर्षे एकच मंत्रिपद जिल्ह्याला मिळाले. आता मात्र छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ दादा भुसे यांच्या समावेशामुळे दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाल्याने जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.नाशिक जिल्ह्णाला ८० च्या दशकांपर्यंत राज्य मंत्रिमंडळात एकच कॅबिनेट मंत्रिपद सातत्याने दिले गेले. स्व. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे यांच्या पाठोपाठ बळीराम हिरे व पुष्पाताई हिरे यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली. त्यातून नाशिक जिल्ह्णाच्या विकासाला हातभार लागला. मात्र १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रिपदांची मोठी लॉटरी लागली. डॉ. दौलतराव आहेर यांना राज्याचे आरोग्य हाताळण्याची संधी मिळाली तर सेनेचे बबनराव घोलप यांना समाजकल्यामंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. याच काळात ए. टी. पवार व तुकाराम दिघोळे यांना काही काळापर्यंत राज्यमंत्रिपदी नेमण्यात आले. याचदरम्यान प्रशांत हिरे यांनादेखील राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद नाशिक जिल्ह्णाला लाभले. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्णातून छगन भुजबळ यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद दहा वर्षे होते. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात ‘युती’चे आठ आमदार असूनही दादा भुसे यांना एकमेव राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मात्र अगोदर छगन भुजबळ व सोमवारी दादा भुसे यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर जिल्ह्णाच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. आता या दोघांकडे कोणती खाती सोपविली जातात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मात्र कोणतेही खाते मिळाले तरी, या दोघांचा जिल्ह्णाच्या विकासासाठी फायदाच होणार आहे.राष्टवादीत नाराजीचा सूरसोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक जिल्ह्याच्या व विशेषकरून राष्टÑवादीच्या कोट्यातून एखादे राज्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने सहा आमदार निवडून पाठविले असल्यामुळे नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर या दोघांपैकी एकाची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तर कॉँगे्रसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनाही राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. राष्टवादीच्या एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे राष्टवादीत नाराजीचा सूर आळवला जात आहे.

 

 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीGovernmentसरकारNashikनाशिक