शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

६४ दिवसांनंतर आज सायंकाळी प्रचार थांबणार; मतदानाला अवघे दोन दिवस

By संकेत शुक्ला | Updated: May 18, 2024 09:18 IST

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा, पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे.

संकेत शुक्लनाशिक : महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नाशिकसह राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये प्रचाराची आज सांगता होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ६४ दिवसांमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना त्यामुळे पुर्णविराम लाभणार आहे. देशभरातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा सायंकाळी ६ वाजता थांबणार असल्याने सर्वच उमेदवारांकडून शनिवारी (दि. १८) शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

पाचव्या टप्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २० मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागाने तापलेल्या वातावरणाचा उदया होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाने सागता होणार आहे. काही पक्षांच्यावतीने रॅली काढली जाण्याची शक्यता असून त्यामुळेही जिल्ह्यातील वातावरण दुपारपर्यंत तापणार आहे. यंदा महायुती आणि महा आघाडी यांच्यात थेट लढत होत असल्याने देशपातळीवरच्या नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावत राजकीय वातावरण अधिक तापवले. नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारीच्या नावावर एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत येथे संदिग्धता पहावयास मिळाली. त्यातच कांद्यासारख्या प्रश्नाने नाशिकध्ये डोके वर काढल्याने त्याचाही परिणाम येथील प्रचारात दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासह मोठ्या नेत्यांनी नाशिकमधील सभांचे मैदान गाजवले.

जवळपास सर्वच सभा सूरळीत पार पडत असताना पिंपळगाव येथे पंतप्रधानांच्या सभेत एका कार्यकर्त्याने केलेला गोंधळ लक्षवेधी ठरला. नाशिक आणि दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची करण्यात आल्याने अनेक मोठ्या नेत्यांनी येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तळ ठोकला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर नाशिकचा तब्बल चार वेळा दौरा केला.इन्फो...

साधु संतांचा पुढाकार चर्चेत

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथेही अनेक साधु महंत पिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील काहींनी माघार घेतली तर काही जण शेवटपर्यंत लढण्याच्या पावित्र्यात असल्याने नाशिक मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते.

ही आहेत बंधने...

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६ अन्वये सार्वजनिक सभा घेण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणूक आयोजित करता येत नाही, उपस्थित राहता येत नाही, सहभागी होता येत नाही किंवा संबोधित करता येत नाही. सिनेमॅटोग्राफ, टेलिव्हिजन किंवा इतर तत्सम उपकरणांद्वारे कोणत्याही निवडणुकीची बाब प्रदर्शित करता येत नाही. कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी असल्याने त्याचे उल्लंघन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.

टॅग्स :nashik-pcनाशिक