शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

५० वर्षांनंतर भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:20 IST

इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचतगटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचतगटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देसाकूर : दुकानदारांसह ग्राहकांचाही प्रतिसाद

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचतगटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचतगटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील साकूर हे गाव दहा ते पंधरा गावांशी संपर्कअसलेले सर्वात वर्दळीचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच या परिसरातील बहुतेक भागात शेतकरीवर्ग असल्यामुळे फ्लावर, कोबी, मिरची, कोथंबीर, टोमॅटो, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, कडधान्ये, तांदूळ, गहू, बाजरी, डाळी, खाद्यपदार्थ, तूप, मसाला आदी प्रकारचा भाजीपाला व वस्तू या बाजारपेठेत विक्र ीस येणार असल्यामुळे विक्र ेते व शेतकरी यांना याचा फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश बाजारपेठ भरविण्याचा असल्याचे सरपंच विनोद आवारी यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी आलेल्या दुकानदारांचे सरपंच आवारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीसपाटील शिवाजी सहाणे, तुकाराम सहाणे, शालेय समितीचे अध्यक्ष समाधान सहाणे, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सहाणे, अनिल उन्हवणे, वैजयंती आवारी, दत्ता आवारी, शोभा सहाणे, मीनाबाई सहाणे, द्रौपदाबाई पावसे, अनिता आवारे आदी उपस्थित होते.बाजाराला जत्रेचे स्वरूपप्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू, कटलरी, भाजीपाला, भांडी, हार्डवेअर, मिठाई, खाऊची दुकाने, तयार कपडे आदींची दुकाने खरेदीदारांना आपल्याकडे आकर्षित करीत होती. साकूर गावाला जणूकाही जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रामदास उगले यांनी या आठवडे बाजाराचे नियोजन केले होते.

टॅग्स :Marketबाजार