नाशिक :गोदावरी नदीवर ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. शहरातील प्रमुख रस्त्याला जोडणारा हा पुल आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. शहरातीची ऐतिहासिक ओळख असलेला हा पुल आजही नागरिकांसह पर्यटकांना आक र्षित करत असतो. ब्रिटीश राजवटीत १४ जानेवारी १८९५ साली शहराच्या दोन मुख्य भागाला जोडण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी मुंबईचे राज्यपाल लॉर्ड हेरीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या पुलासाठी तेव्हाच्या काळात सुमारे १० लाख रुपयांचा खर्च आला होता. तब्बल १२५ वर्षांपासून ऐतिहासिक व्हिक्टोरिया (होळकर पूल) निसर्गाचे अनेक प्रकोप झेलत आहे. या पुलासोबत नाशिकच्या अन्न नाशिककरांच्या अनेक घटना किंबहुना अविस्मरणीय आठवणी जोडल्या आहेत. तेव्हापासून आजवर या पुलाने गोदावरी नदीला आलेले अनेक महापुराचा सामना केला असून देखील आजही या पुलाची भव्यता नाशिककरांसह पर्यटकांना आर्कर्षित करत असतो.
१२५ वर्ष पुर्ण होऊनही ‘व्हीक्टोरिया पुल’ दिमाखात उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:58 IST
‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. शहरातील प्रमुख रस्त्याला जोडणारा हा पुल आजही तितक्याच दिमाखात उभा आहे.
१२५ वर्ष पुर्ण होऊनही ‘व्हीक्टोरिया पुल’ दिमाखात उभा
ठळक मुद्दे‘व्हिक्टोरिया’ पुलाला आज १२५ वर्ष पुर्ण झाली. १४ जानेवारी १८९५ साली या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते