शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लसीकरणामुळे सर्वसामान्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 01:01 IST

देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ...

ठळक मुद्देलसीच्या तुटवड्याने प्रशासनाची धावपळ

देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत.एकीकडे कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका आणि नियोजन्य शून्य लसीकरण मोहिमेमुळे नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. लसीचा तुटवडा आणि त्यामुळे बंद पडलेली लसीकरण केंद्रे यामुळे कोरोनाला कसे हरविणार? हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात कायम आहे. लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत. मग, समाजातील अशा घटकांनी काय करावे, असा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.एकीकडे ग्रामीण भागात कोरोना वाढतो आहे. कधी १८ ते ४४ वयोगातील लसीकरण सुरू आहे, तर कधी ४५ वरील दुसरा डोस सुरू आहे. त्यामध्ये देखील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुटवड्यामुळे हवा तो डोस उपलब्ध होताना दिसत नाही. अनेक केंद्रांवर कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची गरज आहे. मात्र, तिथे कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याने नागरिकांना घेता येत नाही.कोविड लसीच्या तुटवड्यामुळे होणारा पुरवठा तुटपुंज्या लसीच्या डोसमध्ये लसीकरण सुरू आहे. लसी कमी असल्याने ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांना मर्यादित लोकांना लस दिली जात आहे. मात्र, या एकूण प्रक्रियेत नसलेल्या सर्वसामान्य जनतेने, आदिवासी बांधवांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम सरसकट राबवून कोरोनाला हरविण्याचे, रोखण्याचे एकमेव सुरक्षा कवच नागरिकांना जलदगतीने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसtalukaतालुका