शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

By संदीप भालेराव | Updated: August 7, 2023 21:17 IST

प्रवेशाचा मार्ग मोकळा : पूर्तता नसल्याने रखडली होती प्रवेशप्रक्रिया

नाशिक : राज्यातील सात वैद्यकीयमहाविद्यालये आणि एका दंत महाविद्यालयाने अखेर त्रुटींची पूर्तता करण्याबाबतचे हमीपत्र दिल्याने या महाविद्यालयांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संलग्नता प्रदान केली असून त्यामुळे येथील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला आहे.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या महाविद्यालयांना आरेाग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता आहे अशा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मात्र राज्यातील सात वैद्यकीय महाविद्यालये आणि एका दंत महाविद्यालयाने निकषांची पूर्तताच केली नसल्याने त्यांना संलग्नता प्रदान करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तेथील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारीदेखील विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या.

अपुरी शिक्षकसंख्या असल्याने या महाविद्यालयाच्या संलग्नतेबद्दल त्रुटी निर्माण झाल्या होत्या. त्यांना याबाबत विद्यापीठाकडून यापूर्वीही कळविण्यात आलेले होते. मात्र तरीही त्यांनी पूर्तता केली नसल्याने त्यांच्या संस्थेतील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता महाविद्यालयांमार्फत प्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या शिक्षकसंख्येच्या त्रुटी पूर्ततेबद्दल कार्यवाही केली जाईल अशा स्वरूपाचे हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केले असल्याने या महाविद्यालयांना संलग्नता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला याबाबत विद्यापीठातर्फे महाविद्यालय व त्यांच्या प्रवेश क्षमतेबद्दल माहिती देण्यात आल्याचे कुलसचिव राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.

---ही आहेत महाविद्यालये ------१) तेरना मेडिकल कॉलेज नवी मुंबई२) सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज कुडाळ सिंधुदुर्ग३) डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रायगड४) डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती५) महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा६) वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर७) जवाहर मेडिकल फाउंडेशन मेडिकल कॉलेज धुळे८) तेरना डेंटल कॉलेज नवी मुंबई

टॅग्स :NashikनाशिकMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय