नाशिक : राज्याचे माजी रोजगार हमी योजना मंत्री तथा मालेगावचे तत्कालीन आमदार निहाल अहेमद यांच्या मृत्युनंतर त्यांच्या बनावट सह्यांच्या आधारे प्रतिज्ञापत्र तयार करून ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करून त्याद्वारे मालेगावच्या अंजुमन तालिम-ए- जमहुर ही शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या मुलासह सात जणांविरूद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अहेमद यांचा दुसरा मुलगा बुलंद एकबाल निहाल अहमद यानेच ही फिर्याद दिली आहे़
धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिवंगत आमदाराच्या खोट्या सह्यांचे प्रतिज्ञापत्र
By admin | Updated: February 13, 2017 21:19 IST