शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाधित कुटुंबीयांना मिळणार १२०० क्विंटल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:48 IST

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे.

नाशिक : पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. तालुकास्तरावर उपलब्ध बाधित कुटुंबीयांच्या यादीनुसार संबंधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित केले जाणार आहे.गेल्या शनिवारपासून चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये निफाडसह मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील सुमारे ६१९० कुटुंबे बाधित झाली आहेत. या तीनही तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत बाधीत कुटुंबीयांची संख्या सहा हजार इतकी असून, नाशिक तालुक्यात सर्वाधिक बाधित कुटुंबीय आढळले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची घरे पाण्यात असल्यामुळे अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार अद्यापही सावरले नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी या कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत होती. या संदर्भातील नाशिक, निफाड आणि मालेगाव तहसीलदारांनी मागणी नोंदविली त्यानुसार पुरवठा विभागाने धान्याचा साठा मंजूर केलेला आहे. तालुका पातळीवरील यंत्रणेने केलेल्या पाहणीत नाशिक तालुक्यात पुराचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या ३,३७६ इतकी असून निफाडला २,७७४ आणि मालेगावात ४० इतकी बाधित कुटुंबीयांची संख्या आहे. या तीनही तालुक्यांतील ६,१९० कुटुंबीयांना ६१९ क्विंटल गहू आणि ६१९ क्विंटल मंजूर करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने या संदर्भातील धान्य उपलब्ध करून देताना नियमित धान्य वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या बाधित कुटुंबीयांच्या संख्येनुसार प्रतिकुटुंब दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. नाशिक तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा मोठा भाग हा शहराचा आहे, तर अन्य तालुक्यांमध्ये ग्रामीण भाग समाविष्ट आहे. नाशिक तालुक्यातील ३,३७६ बाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे ३३,७६० किलो गहू, तर ३३,७६० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. निफाडसाठी २७,७४० गहू तर २७,७४० किलो तांदूळ, तसेच मालेगावमधील बाधीत कुटुंबीयांना ४०० किलो गहू आणि ४०० किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.आणखी मागणी येण्याची शक्यताबाधित कुटुंबीयांना दहा किलो याप्रमाणे गहू आणि तांदूळ दिला जाणार असून, सध्या तीन तालुक्यांतील बाधित कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची एकूणच परिस्थिती पाहता कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तालुक्यातूनदेखील मागणी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तालुकास्तरीय गुदामातील शिल्लक धान्यातून बाधितांना कुटुंबीयांना धान्य दिले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारfloodपूर