शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साहसी अश्मंतने वाचविले वैफल्यग्रस्त तरुणीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:50 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हर्षोउल्हासाचे वातावरण, शालेय तसेच महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर कुटुंबासह सार्वजनिक सुटीचा आनंद घेत असलेले नागरिक़ शहरात एकीकडे हे दृश्य असतानाच दुसरीकडे आत्महत्या करायचीच अशी खूणगाठ मनामध्ये बांधून आलेल्या एका वैफल्यग्रस्त पंचवीस वर्षीय युवतीने गंगापूर रोडवरील सुयोजित पुलावरून गोदावरी पात्रात उडी घेतली़ मात्र, याचवेळी कारमधून जाणाºया अश्मंत अविनाश दातरंगे (रा़पंडित कॉलनी) या युवकाच्या लक्षात ही बाब आली अन् त्याने मागचा-पुढचा काही विचार न करता नदीत उडी घेत सदर तरुणीस अक्षरश: गाळातून खेचून पाण्याबाहेर काढले व तिचे प्राण वाचविले़

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हर्षोउल्हासाचे वातावरण, शालेय तसेच महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर कुटुंबासह सार्वजनिक सुटीचा आनंद घेत असलेले नागरिक़ शहरात एकीकडे हे दृश्य असतानाच दुसरीकडे आत्महत्या करायचीच अशी खूणगाठ मनामध्ये बांधून आलेल्या एका वैफल्यग्रस्त पंचवीस वर्षीय युवतीने गंगापूर रोडवरील सुयोजित पुलावरून गोदावरी पात्रात उडी घेतली़ मात्र, याचवेळी कारमधून जाणाºया अश्मंत अविनाश दातरंगे (रा़पंडित कॉलनी) या युवकाच्या लक्षात ही बाब आली अन् त्याने मागचा-पुढचा काही विचार न करता नदीत उडी घेत सदर तरुणीस अक्षरश: गाळातून खेचून पाण्याबाहेर काढले व तिचे प्राण वाचविले़ एकीकडे माणूसकी संवेदनाहीन झाल्याची चर्चा करणाºया समाजात अश्मंत दातरंगे या युवकाने दाखविलेले धाडस मात्र कौतुकाचा विषय बनला आहे.  २६ जानेवारीला मिळालेल्या सुटीचा नागरिक आनंद घेत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील गंगापूर रोडवरील सुयोजित पुलावर एक पंचवीस वर्षीय युवती उडी मारण्याच्या तयारीत उभी होती़ याचवेळी कारधून अश्मंत दातरंगे हा युवक शहीद अरुण चित्ते पुलाकडे आपल्या कारने जात होता़ त्याची नजर पुलाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या या युवतीकडे गेली़ अश्मंतने क्षणाचाही विचार न करता आपल्या कारचे ब्रेक दाबले व कार जागेवर उभी केली, मात्र तोपर्यंत तरुणीने पाण्यात उडी देखील घेतली होती.  अश्मंतने कुठलाही विचार न करता या तरुणीपाठोपाठ स्वत:ही पाण्यात उडी घेतली़ विशेष म्हणजे या तरुणीने आत्महत्येची खूणगाठ इतकी मनाशी बांधलेली होती की तिने जगण्यासाठी धडपड वा ‘वाचवा-वाचवा’ अशी कोणास साद देखील घातली नाही़ या तरुणीचे पाय गाळात अडकले व केवळ तिचे हातच वर दिसत होते़ तर तिच्यापाठोपाठ पुलावरून उडी घेतलेल्या अश्मंतचे पायही गाळात अडकले होते, मात्र यातून स्वत:ची सुटका करून घेत आपल्यापासून साधारणत: चार मीटरवर असलेल्या या तरुणीपर्यंत पोहोचत जाऊन तिला पूर्ण ताकदीनिशी बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला़ मात्र ही तरुणी त्यालाच मध्ये खेचत होती़ अखेर, अश्मंत याने आपली संपूर्ण ताकद लावून तरुणीला खेचत नदीच्या किनाºयापर्यंत आणले़ तरीही सदर तरुणी   ‘सोडा़़़सोडा़़़मला़़़मरूद्या’ असे ओरडत होती़ यावेळी पुलावर झालेल्या बघ्यांच्या गर्दीतील नागरिक खाली उतरले व त्यांनी या युवतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ विशेष म्हणजे यावेळी जमलेल्या नागरिकांपैकी काहींनी अश्मंत व आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाºया तरुणीचा फोटो काढायचा प्रयत्न केला असता अश्मंतने समजूतदारपणा दाखवित युवतीचे फोटो न काढण्याची विनंती केली़ दरम्यान, या परिसरात पेट्रोलिंगवर असलेले पोलीस कर्मचारीही एव्हाना घटनास्थळी पोहोचले व या तरुणीला घेऊन गेले़ कारने जात असताना अचानक लक्ष गेले आणि ही युवती उडी मारण्याच्या तयारीत दिसली़ कार थांबवेपर्यंत तिने पाण्यात उडीही मारली होती़ त्याचवेळी मग कोणताही विचार न करता मी पाण्यात उडी मारली आणि गाळातही फसलो़ यानंतर स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत पोहोत जाऊन तिच्यापर्यंत पोहोचलो व संपूर्ण ताकदीनिशी तिला खेचून पाण्याबाहेर काढले़ मी खूप वेगळे असे काहीही केले नसून माझे कर्तव्य पार पाडले आहे़  - अश्मंत दातरंगे, युवक

टॅग्स :Nashikनाशिक