शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचे फायदे अन् तोटेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

नाशिक : सध्या सोशल मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असून, त्यातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे. परंतु सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही असल्याने याचा विचार वापरकर्त्यांनी करायला हवा. सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जाणाºया मजकुराला विश्वासार्हता नसल्याने त्यातून दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता असते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या एचपीटी महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रावर विशेष संपर्कसत्राचे आयोजन केले होते. यावेळी समन्वयक श्रीकांत सोनवणे आणि अशोक देशपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, पत्रकारिता करताना सोशल मीडिया त्यास फायदेशीर ठरत आहे. परंतु जोपर्यंत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या मजकुराची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे धाडसाचे होईल. यावेळी डॉ. मुळे यांनी, ‘बातमी’ या अनुषंगाने माहिती देताना म्हटले की, कुठल्याही विषयाची बातमी होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रत्येक बातमीदाराने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन वार्तांकन करण्याची गरज आहे. असे केल्यास त्याचा बातमीदारालाही फायदा होत असून, त्याच्या जनसंपर्कात वाढच होते. शिवाय बातमीचे स्त्रोतही त्याला निर्माण करता येतात.  यावेळी डॉ. मुळे यांनी, विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. यात बहुतांश विद्यार्थ्यांनी  सोशल मीडियाशी निगडीत प्रश्न विचारले असता, त्यांनी सोशल मीडियावर वापर करताना दक्षता घ्यावी असा सूचक सल्ला दिला. कारण सोशल मीडियांच्या जाळ्यात ज्या पद्धतीने सध्याचा तरुण अडकत आहे, त्यावरून त्याचा वापर करताना दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.