शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:26 IST

मालेगाव: तालुक्यातील गुगूळवाड निघालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. या जागेसाठी सर्वसाधारण गटात निवडून आलेल्या दोन महिलामध्ये पदासाठी वाद झाल्याने पॅनलप्रमुख आर. डी. निकम यांचे मध्यस्थीने सरपंच पदावर आदिवासी महिलेस बसवून वाद मिटविण्यात आला. सर्वसाधारण जागेवर एसटी महिला सरपंच करण्याचा हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरला.

ठळक मुद्दे गुगुळवाडच्या सरपंचपदी सुपाबाई तलवारे; उपसरपंचपदी सुनील निकम

गुगूळवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या चुरशीच्या निवडणुकीत आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील गुगूळवाड विकास आघाडीने सातपैकी पाच जागा पटकावून निर्विवाद बहुमत मिळविले होते, निकम यांच्यासह सुपाबाई तलवारे, रोशनी निकम, सुनील निकम व निलम महाले हे पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले.सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले. पॅनलमधून दोन सर्वसाधारण महिला व एक एसटी राखीव महिला निवडून आल्या होत्या. दोन्हीं सर्वसाधारण महिलांनी सरपंच पदावर दावा केल्याने पॅनलच्या नेत्यांसमोर बिकट प्रसंग निर्माण झाला होता. म्हणून पॅनलच्या प्रमुखांनी दोन्ही सर्वसाधारण महिलांना बाजूला करत सुपाबाई तलवारे या एसटी भिल्ल समाजाच्या महिलेला सरपंचपदाचा मान दिला. युवा सेनेचे प्रमुख सुनील निकम या तरुणास उपसरपंच पदाचा मान दिला, आर डी निकम यांनी उपसरपंच व्हावे म्हणून सर्वांनी गळ घातली होती,तथापि पॅनलची निर्मिती करतानाच उपसरपंच पदाचे नाव निश्चित झाल्याने निकम यांनी उपसरपंचपद घेण्यास नकार दिला. निकम परिवाराने सर्वांनी मिळून सर्वसाधारण महिलेची जागा असताना, एका एसटी महिलेस सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी वाल्मीक निकम, विजू निकम, भालचंद्र निकम, बापु बर्वे, विश्वास निकम, शांताराम निकम, शरद बर्वे, दिनेश बिब्बे,संतोष निकम, भाऊसाहेब निकम,प्रकाश निकम, आप्पा अहिरे, किशोर अहिरे, भूषण निकम, संकेत निकम आदीं उपस्थित होते.नवनिर्वाचित सदस्यांचे गावभर औक्षणदोन महिन्यापासून निवडणुकीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी गावात एकच जल्लोष केला, ढोल ताशा व गुलालाची उधळण करत, गावात जोरदार मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांचे महिलांनी गावभर औक्षण केले.सरपंच उपसरपंच पदासाठी दोनच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राहुल देवरे देवरे यांनी बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहीर केले, निवडणूक पार पाडण्यासाठी, ग्रामसेवक विजया सावळे, तलाठी श्रीमती साबळे ग्रामपंचायतचे कर्मचारी संजय सोनवणे, सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत