शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर

By admin | Updated: June 11, 2017 00:26 IST

तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या नाशिक : महावितरणकडून अघोषित भारनियमन करून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कधी विजेच्या तुटवड्याचे कारण तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणकडून अघोषित भारनियमन करून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे. सध्या शहरातील अनेक विद्यार्थी अकरावीची आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण करीत असून, बारावीचा निकाल जाहीर झाल्याने तंत्र व उच्चशिक्षणाच्या प्रवेशप्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. मात्र, महावितरणकडून होत असलेल्या अनियमित भारनियमनामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यावर्षापासून पहिल्यांदाच अकरावीची प्रवेशप्रक्रियाही आॅनलाइन करण्यात आल्याने आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व्यस्त आहेत. नाशिकसह विभागातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची शक्यता असून, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगची ४६ व फार्मसीची ३८ सुविधा केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. तर शहरातील सुमारे दीडशेहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना शहरात विजेचा खेळ खंडोबा सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी इन्व्हर्टर तथा जनरेटरचा वापर करून प्रक्रिया सुरळीत पार पडली असली तरी अशी व्यवस्था नसलेल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांना थांबून पुन्हा नव्याने अर्ज भरण्यास सुरुवात करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये महावितरण विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत.