लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तंत्रशिक्षण पदविकेच्या प्रवेशप्रक्रियेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सोमवार (दि.१०) ते मंगळवार (दि.२५) आॅगस्ट या कालावधीत राबविली जाणार आहे. या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे. कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी यापद्धतीसोबतच ई-स्क्रुटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची सर्वप्रक्रिया ते स्वत: आॅनलाइन माध्यमातून करू शकणार आहेत. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ी-रू१४३्रल्ल८ पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाइन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती ँ३३स्र://६६६.३िीेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण पदविकेसाठी उद्यापासून प्रवेशप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:22 IST
नाशिक : तंत्रशिक्षण पदविकेच्या प्रवेशप्रक्रियेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सोमवार (दि.१०) ते मंगळवार (दि.२५) आॅगस्ट या कालावधीत राबविली जाणार आहे. या प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण पदविकेसाठी उद्यापासून प्रवेशप्रक्रिया
ठळक मुद्देबारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड