शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठाचे ‘पीजी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:36 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे एमएससी इन फार्मास्युटिकल मेडिसन, हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्र माचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्र मांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्दे२२ जुलैपर्यंत मुदत फार्मास्युटिकल मेडिसीन, पब्लिक हेल्थ शाखांसाठी प्रक्रिया

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे एमएससी इन फार्मास्युटिकल मेडिसन, हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्र माचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्र मांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता करियरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नावीण्यपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नावीण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ही प्रवेशप्रक्रिया असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या मास्टर इन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र मात विद्यार्थ्यांना पोषणविषयक विशिष्ट कार्यक्र माचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्र मांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्र म वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्र मांमधून विद्यार्थ्यांना औषध निर्मिती संदर्भातील क्लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फॉर्माको व्हिजिलन्स रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिको मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल डाटा व्यवस्थापन आदी कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते याकरिता सध्याची परिस्थिती व भविष्यात करियरची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्र माचे पदवीधर या अभ्यासक्र माला प्रवेश घेऊ शकतात. तसेच एम.एस्सी फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्र माकरिता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी तसेच बी.एस्सी, बी.फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्र मास प्रवेश घेऊ शकतात, असे कुलगुरूंनी सांगितले.:

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य