आयुक्तालयात १३ नवीन पोलीस निरीक्षकनाशिक : राज्यभरातील पन्नासहून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत़ त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील पाच निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, आयुक्तालयात १३ नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत़ शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेले सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक विवेक सराफ , भद्रकालीचे निरीक्षक नरेंद्र गायकवाड, गंगापूरच्या निरीक्षक राजश्री गांधी, नितीन तडाखे, संजय महाजन यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत़ सराफ व गायकवाड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर गांधी यांची मुंबई सीआयडी विभागात बदली झाली आहे़ तडाखे व महाजन यांनी दोन महिन्यांपूर्वीच पदभार घेतला होता़ (प्रतिनिधी)बदलून आलेले अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण)मधुकर कड (दहशतवाद विरोधी पथक, नाशिक), नम्रता देसाई (महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी), मिलिंद बागूल (राज्य गुन्हे अन्वेषण), अनिल पवार (अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी समिती), विनायक लोकरे (दहशतवाद विरोधी पथक), दिनेश वर्डेकर (बुलडाणा), शंकर कांबळे (बृहन्मुंबई), बाळकृष्ण चव्हाण (राज्य गुन्हे अन्वेषण),अशोक भगत (विजाप्रतस, धुळे), पंढरीनाथ ढोकणे (राज्य महामार्ग), फुलसिंग वळवी (बृहन्मुंबई)़
आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या
By admin | Updated: May 29, 2014 00:26 IST