शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महासभेची ध्वनीफित देण्यास प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:37 IST

नाशिक : नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफित शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफित देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा ...

नाशिक : नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफित शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफित देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.बुधवार, दि. २० सप्टेंबरला झालेल्या महापालिकेच्या झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र, सेनेला काउंटर करण्यासाठी लगोलग भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही लक्षवेधी सादर करत शहरात साथरोगाचा प्रभाग गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सात तास चाललेल्या महासभेत शिवसेना प्रशासनावर तुटून पडली असताना भाजपाचे एकेक नगरसेवक प्रशासनातील अधिकाºयांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसोद्गार काढत होते. महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनीफित संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकवण्याचे शिवसेनेने ठरविले होते. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनीफितही मागविली होती. मात्र, नगरसचिव विभागाने अशाप्रकारे ध्वनीफित देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर ध्वनीफित ही प्रशासनाच्या कामकाजासाठी असते. त्यामुळे ती अन्य कुणाला देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही नगरसचिव विभागाने म्हटले आहे. नगरसचिव विभागाने ध्वनीफित देण्यास नकार दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. मात्र, यामुळे शिवसेनेकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.