शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:19 IST

येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्र मासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन पीठाधीश रवींद्रकीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी उपस्थित होत्या.

ठळक मुद्देअधिकाºयांची बैठक : मांगीतुंगी येथे मंडपाचे भूमिपूजन

नाशिक : येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. तसेच अधिकाºयांच्या एका तुकडीने हेलिपॅडच्या जागेची पाहणी केली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्र मासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन पीठाधीश रवींद्रकीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी उपस्थित होत्या.दिगंबर जैनांचे तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या २२ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. साध्वी प.पू. ज्ञानमती माताजी आयोजित विश्वशांती अहिंसा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.राष्टÑपतींच्या दौºयासंदर्भात नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक संजय दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, टेलिफोन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच रवींद्रकीर्ती स्वामी, अनिल जैन, संजय पापडीवाल, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विजय जैन उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठीची आवश्यक माहिती तसेच सुरक्षेसंबंधी सर्व माहिती देण्यात आली.या बैठकीनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलोत्पर, सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाचे अधिकारी यांनी मांगीतुंगी येथे जाऊन कार्यक्र मस्थळाचीतसेच हेलिपॅडच्या जागेचीही पाहणी केली. तसेच त्यासंदर्भात आयोजन समिती व संबंधित विभागांना सूचना दिल्या. शुक्रवारी (दि. १२) मांगीतुंगी येथे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षेखाली सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.मान्यवरांना निमंत्रणया कार्यक्र मासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही आयोजन समितीतर्फेमुंबई येथे जाऊन निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, पीठाधीश रवींद्रकीर्ती, अनिल जैन, संजय पापडीवाल, भूषण कासलीवाल, कमल कासलीवाल, मांगीतुंगी प्राचीन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद