शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अन्नाची शपथ घेणारे अन् मिठी मारणारेच निघाले गद्दार; मंत्री भुसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा घणाघात 

By suyog.joshi | Updated: August 21, 2022 00:34 IST

मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो.

मालेगाव - ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांना मित्र समजलो, ज्यांनी मातोश्रीवर येऊन अन्नाची शपथ  घेतली. त्यांनीच गद्दारी केली, अशी घणाघाती टीका मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. ते शनिवारी शिवसंवाद यात्रेनिमित्त मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात आयोजित सभेत बोलत होते.मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो. जिंकून आल्यावर मंत्रीपद दिले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आमच्या घरी येऊन अन्नाचीची शपथ घेतली त्यांनीच पाठीत वार केला. आधी कृषी मंत्री पद होते आता कोणते खाते दिले ते मलाही आठवत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यात बेईमानांचे सरकार आले आहे.  तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेम, मंत्रीपदे दिले तरी त्यांचे पद हिसकाऊन चाळीस गद्दाराना काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही वृत्ती भयानक आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. जिकडे  जायचे तिकडे पण ईडीच्या व  दबावापोटी पक्ष का सोडल्याची टीका ठाकरे यांनी केली. आमदारकीचा राजीनामा द्या. मध्यावधी निवडणुकींना सामोरे जा. 

राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत, राज्यात काही भागात  पूरस्थिती आहे. हे निर्लज्ज सरकार काहीच करत नाही. यांचे मंत्री कुठे फिरत नाहीत. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री हवेत  विमान थांबवतात. मालेगावमध्ये परत येणार असेच प्रेम व आशीर्वाद असू द्या असे आवाहन  ठाकरे यांनी केले. शासन बेकायदेशीर असले तरी आपण शासनाचे नियम पाळू  वेळेवर सभा संपवू. तुमच्या प्रेम व बळावरच पुढे जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले  सभेनंतर मॉर्निंग स्टार चौकात  युवा सेना शाखेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले.त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे रवाना झाला. धुळ्याहून मालेगावी येतांना झोडगे, गिरणा पुलावर शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. सभेला आमदार नरेंद्र दराडे, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी , राजाराम जाधव, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.