शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:36 IST

कळवण : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. २९) पासून सुरु वात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.

कळवण : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. २९) पासून सुरु वात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.  शारदीय नवरात्रोत्सव विजयापर्यंत चालणार आहे. कावड यात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव १२ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत होत आहे. या कालावधीत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने तसेच विविध धार्मिक संस्थांतर्फे कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत विविध सेवाभावी संस्थांतर्फे गडावर व गडाकडे येणार्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज दाखल होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजता भगवतीची पंचामृत महापूजाहोणार असून सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.  नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या सोमवार ७ आॅक्टोंबर आश्विन शुध्द महानवमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा, दुपारी ४ वाजता न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पूजन झाल्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल व त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. तसेच सायंकाळी पाच वाजता सभामंडपात शतचंडी योग, होम हवन पूजा होणार आहे. याच दिवशी रात्री १२ वाजता शिखरावर कीर्र्तिध्वजाचे मानकरीध्वजारोहण करतील.मंगळवार, ८ आॅक्टोंबर अर्थात विजयादशमीला सकाळी दहा वाजता शतचंडी याग व पूर्णाहूती होईल व त्यानंतर गडावर दसरा साजरा करण्यात येईल.शनिवार, १२ आॅक्टोबर रोजी कोजागिरीपौर्णिमा उत्सावास प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी ७ वा. पंचामृत महापूजा होईल. रविवार १३आॅक्टोंबरला सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा व दुपारी साडेबारा ते रात्री ८ वाजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून ठिकठिकाणावरु न कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल. यानंतर भगवतीचा रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत जलाभिषेक पंचामृत महापूजा होणार आहे. दि.१४ आॅक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजता शांतीपाठ होवून महाप्रसाद वाटपाने नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवाची सांगता होणारआहे.

टॅग्स :Nashikनाशिक