शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:40 IST

काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे.

आडगाव : काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे. रस्ते, पाणी, बांधकाम क्षेत्र व पार्किंगसाठी प्रशस्त जागा आणि मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या या वास्तुचा पर्यायी वापर करणे गरजेचे असल्याचे मत आता येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भव्य वास्तुचा सुयोग्य वापर करावा जेणेकरून येथील विकासाला चालना मिळेल व रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. आज ट्रक टर्मिनलच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बस्तान बसवले असून, ट्रान्सपोर्टनगर म्हणूनच एक वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक गाड्यांचीदेखील नेहमीच वर्दळ असते. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पूरक व्यवसायासाठी या ट्रक टर्मिनलचा वापर होऊ शकतो. याशिवाय शहर परिसरात महामार्गाजवळ असलेले गॅरेज, वर्कशॉप व्यावसायिकांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्यास मनपाच्या उत्पन्नात भर पडेल आणि व्यवसायवृद्धीला फायदा होईल. याशिवाय महामार्गावर सर्व्हिस रोडवर अनेक ट्रान्सपोर्ट व गॅरेज व्यावसायिकांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या व्यासायिकांना त्याठिकाणी सोयीची जागा उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. या ठिकाणी कृषी व्यवसायाला पूरक असा उद्योगदेखील सुरू करता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने ओस पडलेल्या ट्रक टर्मिनलच्या वास्तुचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ही वास्तु वापरात येईल व उत्पन्नात भर पडेल, अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत. ट्रक टर्मिनल येथे उपाहारगृह, सुविधा गाळे म्हणजेच दवाखाना, किराणा, व इतर व्यवसायासाठी उभारण्यात आले होते. यातील अनेक गाळे आज रिक्तच आहे.शेजारील जागेवर आरक्षण कायममहानगरपालिकेने १८ ते २२ एकर जागा ट्रक टर्मिनलसाठी विकास आराखड्यात आरक्षित केलेली आहे. त्यापैकी ५ ते ८ एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभे केले. उर्वरित ठिकाणी ट्रक टर्मिनल उभे केले नसले तरी आरक्षण कायम ठेवले. यावेळी जागा मालकांनी विकास आराखड्याच्या मंजुरीपूर्वी हरकती नोंदविल्या होत्या. शिवाय हरकतींवर झालेल्या सुनावणी दरम्यान कमिटीच्या तज्ज्ञ सदस्यांनी नागपूर महानगरपालिकेत अशी आरक्षणे हटविली असून, जागा विकसित करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सांगून २० वर्षांत आरक्षण असूनही जागा ताब्यात घेतल्या नाही शिवाय नवीन विकास आराखड्यातून आरक्षण हटविले नाही. त्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळत नाही, अशी खंत जागा मालकांनी व्यक्त केली आहेजागा मालकांवर अन्यायमहामार्गालगत असलेल्या इतर जागेला सोन्यासारखी किंमत असूनही आरक्षणामुळे येथील जागांची किंमत कवडीमोल ठरली आहे. त्यामुळे ‘आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी गत येथील जागा मालकांची झाली आहे. महानगरपालिका पैसे नसल्याचे कारण पुढे करत या जमिनी ताब्यात घेत नाही आणि विकसित करायला परवानगीही देत नाही. त्यामुळे येथील जागामालक कात्रीत सापडले आहे. जागा विकसित होत नसल्याने महानगर पालिकेच्या घरपट्टी व इतर माध्यमातून मिळणाºया उत्पन्नातदेखील घट होत आहे . या परिसराचा विकास त्यामुळे खुंटला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका