शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी वैद्यकीय यंत्रणेची अतिरिक्तकुमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:23 IST

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या

ठळक मुद्दे१४२ डॉक्टर, नर्स रवाना : रुग्ण उपचाराला होणार मदतया सर्वांना तातडीने मालेगावी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आणखी १४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक शुक्रवारी मालेगावच्या मदतीला रवाना करण्यात आली आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेचे ४० आरोग्य अधिकारी मालेगावच्या दिमतीला देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात प्रथम निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा व मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता आरोग्य विभागाने कोरोनाचा एकच रुग्ण सापडल्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलून कोरोनावर नियंत्रण मिळविले. मात्र मालेगावी अचानक एकापाठोपाठ रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले असून, मालेगाव महापालिकेची आरोग्य व्यवस्था त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अपुरी पडत असल्याचे पाहून ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी मालेगावची परिस्थिती लक्षात घेऊन ४० वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिकांची सेवा वर्ग केली. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून या संदर्भात गुरुवारी रात्री पुन्हा १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यात फिजिशियन, भुलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका, आरोग्य सहायकांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने मालेगावी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद