शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दाखल्यांसाठी जादा अधिकारी

By admin | Updated: June 21, 2016 23:50 IST

विद्यार्थी, पालक हैराण : प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

नाशिक : सेतू केंद्रातून वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक हैराण झालेले असताना, दाखल्यांवर स्वाक्षऱ्या होत नसतील तर त्यासाठी जादा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. परंतु शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत निकट आलेली असताना, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यापेक्षा आणखी काय करू शकतो, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन महिन्यांपासून सेतू केंद्राच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून, महिना उलटूनही दाखले मिळत नसल्याने सकाळपासून सेतू केंद्राबाहेर विद्यार्थी, पालकांची रिघ लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सेतू केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी, सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या त्रुटी दूर होत नसल्याने केंद्र चालकानेही हात टेकले आहेत. या साऱ्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत निकट आली असून, दाखल्यांसाठी त्यांची वणवण सुरू आहे. काही वेळा दाखल्यांवर अधिकारी स्वाक्षरी करीत नसल्याची तक्रार केली जाते तर काही वेळा सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असला तरी, यासाऱ्या गोष्टींशी विद्यार्थी, पालकांना काही देणे-घेणे नाही. पालकांच्या या असहाय्यतेचा फायदा दलालांनी उचलला असून, उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी दाखले विलंबाने मिळतात, याविषयी आश्चर्य व्यक्त केले. सात दिवसांत पालकांना दाखले देण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगून, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना दाखले पडून असतील तर जादा अधिकाऱ्यांची नेमणूक करू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)