शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:49 IST

कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़

नाशिक : कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़ कार फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़  गंगापूररोड परिसरातील सावरकरनगरमधील रहिवासी जयंत पगारे व त्यांचे सहकारी चारुदत्त वाघ हे बुधवारी (दि़१९) मुंबई-आग्रा रोडवरील राजीवनगर परिसरात गेले होते़ त्यांनी आपल्या दोन्ही बोलेरो (एमएच ४६ एक्स ७७१८ व एमएच १५ सीटी ७९२९) वाहने ग्रॅण्ड रिओ हॉटेलजवळ पार्क केली होती़ चोरट्यांनी या दोन्ही वाहनांच्या काचा फोडून १२ हजार रुपयांचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप, दोन हजार रुपयांचे वायफाय डिव्हाइस, ३० हजार रुपयांचा डेल कंपनीचा लॅपटॉप, एक हजार ५०० रुपयांचा वायफाय डिव्हाइस व दहा हजार रुपयांचा आयफोन मोबाइल असा ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  इंदिरानगरमधील रहिवासी अर्जुन भालसिंग (रा. भक्तिधाम अपार्टमेंट, श्रद्धाविहार) हे बुधवारी (दि़१९) कॉलेज रोडच्या बिगबझारमागे असलेल्या एका मॅटर्निटी होममध्ये कामानिमित्त गेले होते़ त्यांनी पार्क केलेल्या वॅगनर कारची (एमएच १५ जीए ९५२२) काच फोडून चोरट्यांनी त्यातील तीस हजार रुपयांचे दागिने व दोन हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोच्या शिवाजी चौकातील रहिवासी अविनाश खैरनार हे बुधवारी (दि़१९) कामानिमित्त शहरात आले होते़ त्यांनी आपली बलेनो कार (एमएच १५ जीएफ ४७९०)गोल्फ क्लब ग्राउंडशेजारील बस स्टॉपजवळ पार्क केली होती़ चोरट्यांनी कारची काच फोडून त्यातील चाळीस हजार रुपयो किमतीचा लॅपटॉप चोरून नेला़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लॅपटॉपसह ऐवज लंपासगंगापूररोडवरील रामेश्वरनगरमधील रहिवासी भूषण पाटील हे बुधवारी (दि़१९) सायंकाळी कामानिमित्त सीटी सेंटर मॉलला गेले होते़ त्यांनी आपली शेवरलेट कॅप्टिवा कार (एमएच १५, डीएस ४७७७) मॉलच्या बाजूच्या गल्लीत पार्क केली होती़ चोरट्यांनी या कारच्या काचा फोडून ५० हजार रुपये किमतीचा अ‍ॅप कंपनीचा लॅपटॉप, जळगाव जनता बँकेचे पासबुक व हार्डडीस्क असा ५२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :carकारThiefचोर