शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-कळवण रस्त्याच्या रुंदीकरणाची कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:39 IST

नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तूर्तास सदरहू रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दिंडोरी व वणी येथे उड्डाणपूल करण्यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

दिंडोरी : नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तूर्तास सदरहू रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दिंडोरी व वणी येथे उड्डाणपूल करण्यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. नाशिक शहरातील उड्डाणपुलाप्रमाणे दिंडोरी व वणी शहरात उड्डाणपूल व्हावा यावर सर्वांचे एकमत झाले असून, राष्ट्रीय महामार्ग होताना त्यात त्याचा समावेश करण्यात येणार आहे.  नाशिक-दिंडोरी-वणी - कळवण रस्त्याच्या कामकाजासंदर्भात खासदार चव्हाण यांनी दिंडोरी ग्रामस्थांची बैठक आयोजित करत ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेतल्या. सदर रस्त्याबाबत योग्य ते नियोजन करून सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार असून, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सदर रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी सर्व नागरिकांच्या भावना जाणून घेत सदर ररस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. या रस्त्यावर वणी, दिंडोरी येथे उड्डाणपूल करावा की बाह्यवळण रस्ता करावा याबाबत चर्चा झाली. यात उड्डाणपूल व्हावा असे एकमताने ठरवण्यात आले. तसेच तळेगाव, अवनखेड येथे बोगदे करण्याची तसेच ओझरखेड धरणाखालील पूल मोठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान तूर्तास सदर रस्त्याची रु ंदी व नादुरु स्ती पाहता तातडीने सदर रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, नाशिक-दिंडोरी-वणी-कळवणपर्यंत १० मीटर रस्ता होणार आहे, तर दिंडोरी, वणी शहरात १४ मीटर रस्ता होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कंकरेजा यांनी सांगितले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी लखमापूर फाटा येथे रस्ता रुंदीकरण करण्याची तसेच ओझरखेड येथे पूल करण्याची सूचना केली. तसेच दिंडोरी शहरात रस्त्यातील विजेचे खांब हलविण्याच्या सूचना केल्या.बैठकीत नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, विश्वासराव देशमुख, नरेश देशमुख, राजू मोरे, तुषार वाघमारे, शिवाजी पिंगळ, नरेंद्र जाधव, योगेश बर्डे आदींनी विविध सूचना मांडल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे उपसभापती उत्तम जाधव, चंद्रकांत राजे, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी अनंत जवादवार, सहा पोलीस निरीक्षक पाटील, सतीश देशमुख, फारुख बाबा, मनोज ढिकले, संतोष मुरकुटे, रमेश बोरस्ते आदी उपस्थित होते सूत्रसंचालन नरेश देशमुख यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाण