नाशिक : महापालिकेकडून बुधवारपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत पश्चिम विभागातील २३ धार्मिक स्थळे शुक्रवारी (दि़ १०) पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली़ सिडको, सातपूर व नाशिक पश्चिममधील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे काम तीन दिवसांत पूर्ण झाले असून, शनिवारी (दि़ ११) पूर्व विभागातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत़ विशेष म्हणजे, शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत बहुतांशी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतल्याने किरकोळ प्रकार वगळता ही मोहीम शांततेत पार पडली़, तर अशोकस्तंभ व इंदिरानगर परिसरात या मोहिमेदरम्यान वाहतूक कोंडी झाली होती़उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात बुधवारपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहीम सुरू आहे़ शुक्रवारी अशोकस्तंभावरील गुरांच्या दवाखान्याजवळ रस्त्यालगत असलेले एक धार्मिक स्थळ हटविण्यापासून या मोहिमेस प्रारंभ झाला़ संवेदनशील परिसर म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पाहणी केली होती़ प्रारंभी धार्मिक स्थळ हटविण्यास किरकोळ विरोध झाला, मात्र कारवाई पूर्ण करण्यात आली़ या ठिकाणी कारवाई सुरू असताना पोलीस आयुक्तालयापर्यंतचा रस्ता एकेरी करण्यात आल्याने काहीकाळ वाहतुकीची कोेंडी झाली होती़ महापालिकेच्या या अतिक्रमणविरोधी पथकाकडून घनकर गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ असलेले धार्मिक स्थळ, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड या ठिकाणची धार्मिक स्थळे हटविण्यात आली़ दुपारनंतर मुंबई नाका, सहवासनगर तसेच इंदिरानगर बोगद्याजवळील धार्मिक स्थळे हटविण्यात आली़ पश्चिम विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविल्यानंतर पूर्व विभागातील तीन धार्मिक स्थळेही जमीनदोस्त करण्यात आली़ या मोहिमेसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सुनील नंदवाळकर तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह धुळे येथील सीआरपीएफ पथक तैनात होते़
पश्चिम विभागातील कारवाई पूर्णमहापालिका : अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहीम; पश्चिम-पूर्वमधील २६ बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:28 IST
महापालिकेकडून बुधवारपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत पश्चिम विभागातील २३ धार्मिक स्थळे शुक्रवारी (दि़ १०) पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली़ सिडको, सातपूर व नाशिक पश्चिममधील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे काम तीन दिवसांत पूर्ण झाले असून, शनिवारी (दि़ ११) पूर्व विभागातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत़
पश्चिम विभागातील कारवाई पूर्णमहापालिका : अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहीम; पश्चिम-पूर्वमधील २६ बांधकामांवर हातोडा
ठळक मुद्देकिरकोळ प्रकार वगळता ही मोहीम शांततेत मोहिमेदरम्यान वाहतूक कोंडी बोगद्याजवळील धार्मिक स्थळे हटविली़