शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:41 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकला पोलिसांकडून कारवाईचा बडगा

त्र्यंबकेश्वर : सध्या कोविडचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी शुभम गुप्ता व तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यापक मोहीम कुशावर्तापासून सुरू करण्यात आली आहे.कोविडने सर्वत्र पुन्हा उसळी मारली असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या सुशिक्षित नागरिकांकडून एक हजार रुपये, ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब ग्रामस्थांकडून दोनशे रुपये दंड म्हणून आकारणी केली जात आहे.सध्या त्र्यंबकेश्वरला एकही कोविड केअर सेंटर नाही. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब घेतले जातात. मात्र, रुग्णांना जिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेकडे व लोकांनादेखील दिली जात नाही. जिल्ह्यात नाशिक, मालेगाव व सिन्नर, निफाड, देवळा आदी भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. उर्वरित कमी रुग्णसंख्या असलेल्या भागात कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.उर्मट तसेच साथीचे संसर्गजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अशा २६८ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आदी ही मोहीम राबवित आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर