शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार लोकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:44 IST

नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा १३० वर पोहोचला आहे. यापैकी ११ रुग्ण दगावले आहेत. एकूण ३२८ कोरोना संशयित रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, झाकीर हुसेन रुग्णालय, सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारासाठी दाखल आहेत. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे, अत्यावश्यक गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे सपशेल दुर्लक्ष करून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य सर्रासपणे भाजीपाला, किराणा खरेदीसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.-------१ हजार ९५० दुचाकी जप्तनागरिकांनी सर्रासपणे रस्त्यांवर दुचाकीने संचार करू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून रस्ता बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील तीन महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप १ हजार ९५० दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त केल्या गेल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक