शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत गैरफायदा कोल्हापूर येथील शिक्षिकेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:52 IST

आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत विशेष संवर्ग भाग-२ मधून पती-पत्नी एकत्रीकरण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत विशेष संवर्ग भाग-२ मधून पती-पत्नी एकत्रीकरण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  कोल्हापूर येथील एक शिक्षिक ा या योजनेअंतर्गत चुकीची माहिती भरून अांतरजिल्हा बदलीने नाशिक येथे हजर होण्यासाठी आली होती. परंतु, शिक्षिकेने चुकीची माहिती भरून या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रशासनाच्या समोर आल्याने संबंधित शिक्षिकेला कोल्हापूरला परत पाठविण्यात आले असून, याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेस पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. ११) दिली.  कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका प्रतिभा मोरे यांनी आंतरजिल्हा बदलीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विशेष संवर्ग भाग-२ मधून बदलीसाठी आॅनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची बदली होऊन त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेकडे हजर करून घेणेसाठी अर्ज दिला होता. याबाबत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी तथा पडताळणी केली असता प्रतिभा मोरे यांनी आॅनलाइन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पती कोल्हापूर येथे सेवेत असतानाही त्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण करणेसाठी अर्ज सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.  आॅनलाइन अर्जात चुकीची माहिती सादर करून आंतरजिल्हा बदली केली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रतिभा मोरे यांना नाशिक जिल्हा परिषदेत रुजू करून न घेता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे परत पाठविले असून, यासंबंधीचे पत्रही कोल्हापूर जिल्हा परिषदेला पाठविण्यात अल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद