शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान करणाऱ्यांवर ‘कोटपा’अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:41 IST

सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाºयांवर ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये सरकारवाडा हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाई केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली कारवाई ही शहरातील कोटपा कायद्यांतर्गत करण्यात आलेली पहिलीच कारवाई आहे़ यापूर्वी या कायद्याची शहरात अंमलबजावणी शून्य होती़

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाºयांवर ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये सरकारवाडा हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाई केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली कारवाई ही शहरातील कोटपा कायद्यांतर्गत करण्यात आलेली पहिलीच कारवाई आहे़ यापूर्वी या कायद्याची शहरात अंमलबजावणी शून्य होती़ सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३ ( कोटपा ) या कायद्याचे संबंध हेल्थ फाउंडेशनने शहर पोलिसांना काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षण दिले़ या प्रशिक्षणानंतर गुरुवार (दि़ २२) पासून या कायद्यान्वये कारवाई करण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात  आली़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी. एस. राठोड, पोलीस नाईक संजय आहिरे, पोलीस हवालदार सागर हजारे, श्रीकांत महाजन यांच्या पथकाने के. टी. एच. एम. महाविद्यालय, पंडित कॉलनी, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉर्नर, तिबेटियन मार्केट, कॉलेजरोड आदी ठिकाणी कारवाई केली.शाळा व महाविद्यालय परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हे कायद्याचे गुन्हा आहे़ मात्र तरीही शहरातील एस. टी. डेपो, बसस्थानके, शाळा-महाविद्यालये, बाजार, तसेच धार्मिक तीर्थस्थळाच्या ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते़ शहरात धूम्रपान, सुट्या सिगारेटची विक्री, अवैद्य गुटखा विक्री यास आळा घालण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत आता कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे़व्यसनापासून रोखण्यासाठी कारवाई आवश्यकसार्वजिनक ठिकाणे तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस कायद्याने बंदी असून, त्यासाठीच कोटपा कायदा तयार करण्यात आला आहे़ युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम आवश्यक आहे़- अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सरकारवाडा पोलीस ठाणे

टॅग्स :Smokingधूम्रपानPoliceपोलिस