शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्यास कारवाई

By admin | Updated: April 23, 2017 01:42 IST

नाशिक : जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे.

 नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बॅँकेचा पाय दिवसागणिक खोलात जात आहे. जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. यापूर्वीच सेवानिवृत्तांचे वेतन जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेकडून काढून अन्यत्र वर्ग केले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या स्वाक्षरीने बुधवारी (दि. १९) जिल्हा परिषदेने एक पत्र जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना पाठविले आहे. वसुली न झाल्याने व ३४१ कोटींच्या नोटा बदलून न दिल्याने जुन्या नोटा पडून असल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिंक कोेंडी झालेली आहे. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी जिल्हा बॅँकेचे प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅँकेतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. तसेच मक्तेदारांचे धनादेश वटत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच कर्मचारी व मक्तेदारांच्या तक्रारी वाढतच आहे.यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेल्या आठवड्यातच जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांना बोलावून आर्थिक व्यवहार सुरळीत करावे, अन्यथा खाते बदलण्याचा इशारा दिला होता. हा इशारा देऊनही बॅँकेचे कामकाज जैसे थेच राहिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा बॅँकेतील खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)