शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अनकाई किल्ल्यावर ३२ पर्यटकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:04 IST

येवला : कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने सर्वत्र पर्यटन बंद झाले असताना तालुक्यातील अनकाई येथील किल्ल्यावर काही शौकीन ...

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन : तीन जणांवर गुन्हा दाखल

येवला : कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने सर्वत्र पर्यटन बंद झाले असताना तालुक्यातील अनकाई येथील किल्ल्यावर काही शौकीन पर्यटनासाठी आले होते. किल्ल्यावरील गर्दी पाहून दाखल झालेल्या पोलिसांनी ३२ पर्यटन शौकीनांना दंडूक्याचा प्रसाद देण्याबरोबरच त्यांच्याकडून नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान तीन जणांवर कलम १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पावसाळा सुरू झाला की, हिरवळीने नटलेला अनकाई किल्ला परिसर भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाऊनमध्ये बंदी असतानाही रविवारी (दि.६) किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी झाली. काही जण तर मौजमजा करीत होते. विशेष म्हणजे यात सिन्नर, संगमनेर, वैजापूर, नांदगाव, मनमाड आदी गावातील पर्यटक होते. याची माहिती मिळताच किल्ल्यावर पोलिस दाखल झाले. त्यांनी काहींना उठबशा काढण्याची शिक्षा केली, काहींना दंडुक्याचा प्रसाद दिला. काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी हौशी पर्यटकांची चांगलीच कानउघडणी केली. सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंग राजपूत, वाहतूक पोलिस एच. डी. पवार, भालके, होमगार्ड माळी, मुलानी, करवर, देवकर आदींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.पावसाळा सुरू झाला की, हिरवळीने नटलेला अनकाई किल्ला परिसर भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाऊनमध्ये बंदी असतानाही रविवारी (दि.६) किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी झाली. विशेष म्हणजे यात सिन्नर, संगमनेर, वैजापूर, नांदगाव, मनमाड आदी गावातील पर्यटक होते. माहिती मिळताच किल्ल्यावर पोलिस दाखल झाले. त्यांनी काहींना उठबशा काढण्याची शिक्षा केली, काहींना दंडुक्याचा प्रसाद दिला. काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी हौशी पर्यटकांची चांगलीच कानउघडणी केली.

टॅग्स :FortगडPoliceपोलिस